डोंबिवली, दि. २४ (प्रतिनिधी) : श्रावण महिन्यातला आज पहिला सोमवार असल्यामुळे शिवमंदिरात गर्दी झाली होती. शिव मंदिरात ‘हर हर महादेव’चा जयघोष करत भाविक दर्शनासाठी रांगेत उभे होते.
पूर्वेकडील गणेश मंदिरातील शिवलिंगावर रुद्राभिकेक करण्यात आला. तर दत्तनगर येथील शिवमंदिरात महादेवाचे पूजन करण्यात आले. पश्चिमेकडील जुनीडोंबिवली व जयहिंद कॉलनी येथील शिवमंदिरात महादेवाचे दर्शन घेण्यास भक्तांनी गर्दी केली होती. ग्रामीण विभागातील सोनारपाडा येथील प्राचीन मंदिरात श्रावण प्रारंभ आणि पहिला सोमवार म्हणून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. पिंपळेश्वर मंदिरात शिव पुराण कथा पारायण सूर करण्यात आले आहे. आचार्य पंडित हृदयशंकर तिवारी महाराज हे सदर पारायण सादर करीत आहेत. पूर्ण महिनाभर शिव पुराण कथा पारायण होणार असून भाविकांनी आनंद घ्यावा असे आवाहन पिंपलेश्वर मंदिर संस्थान अध्यक्ष प्रकाश म्हात्रे यांनी केले आहे.
डोंबिवली आणि ग्रामीण विभागर शिव मसनदीरात ‘हर हर महादेव’, बम बम भोलेच्या जयघोष होत आहे.