डोंबिवली, दि. २२ (प्रतिनिधी) : रोटरी क्लब डोंबिवली सेंट्रलचे २०१६-१७ चे विद्यमान अध्यक्ष रो. गजानन जोशी यांनी २०१७-१८ साठी नवनिर्वाचित अध्यक्ष रो. प्रसाद कुलकर्णी यांच्याकडे नवीन वर्षांची सुत्रे सुपूर्द केली. सदर सोहळा माजी प्रांतपाल रो. बाळ इनामदार यांच्या प्रमुख उपस्थित झाला. विशेष म्हणजे इनामदार यावेळी यांची इनामदार धान्यांची तुला करण्यात आली.
पूर्वेकडील जिमखाना सभागृह येथे नुकत्याच पार पडलेल्या पदग्रहण कार्यक्रमात रो. गजानन जोशी यांनी त्यांच्या कारकिर्दीतील कार्याची माहिती देतांना सांगितले कि, पोलीस कमिशनर ठाणे कार्यालयातील सुमारे ७५० पोलीस अधिकारी आणि इतर पोलीस कर्मचाऱ्यांची वैद्यकीय तपासणी कार्यक्रम महत्वाचा वाटला. रोटरीच्या माध्यमातुन पडघा येथील भारतमाता हायस्कूल, सी.पी. कार्यालय ठाणे, राधाबाई साठे आदी शाळातील विद्यार्थ्यांना पिण्याचे पाणी शुद्ध मिळावे म्हणून अॅक्वागार्ड व वॉटरप्युरिपायर देण्यात आले. तसेच वैद्यकीय मोफत शिबिरांच्या माध्यमातून शाळांमधून ब्लड डोनेशन कॅम्प, नेत्रचिकित्सा कॅम्प, डेंटल चेक अप कॅम्प आदी तपासण्या करण्यात आल्या. अशा पद्धतीने समाजपयोगी कार्यक्रम सर्वांच्या सहकार्याने करता आले. याकरिता सचिव डॉ. मीना सवारी, सुचित्रा सामंत, सरोज नेरुरकर, स्मिता धवले आणि उल्का तेंडूलकर यांनी मोलाचे सहकार्य केले. अशा प्रकारच्या एकत्रित कार्यामुळेच रोटरी क्लब डोंबिवली सेंट्रलला डीस्ट्रीक ३१४२ चे गव्हर्नर चंद्रशेखर कोलवेकर यांनी “प्लाटिनम क्लब” हा दर्जा बहाल केला हे सांगताना आनंद वाटतो असे सांगितले. यावेळी प्रमुख पाहुणे माजी प्रांतपाल रो. बाळ इनामदार यांनी सर्व रो. पदाधिकारी यांनी केलेल्या कार्याचे कौतुक करून सामाजिक बांधिलकीच्या माध्यमातून आणखी भरीव कार्य करा असा जेष्ठ रोटरियन म्हणून सल्ला दिला.