चाकुने वार करून चोरली सोनसाखळी

डोंबिवली, २६ (प्रतिनिधी) : सोनसाखळी चोऱ्यांचे प्रमाण वाढत असून पुन्हा पूर्वेकडील टंडन रोडवर सोनसाखळी चोरीचा प्रकार घडला आहे. ग्रामील विभागातील दावडी गावातील एक इसम मंगळवारी सकाळी 10 वाजता पूर्वेकडील टंडन रोडवरील नेत्रालय प्लश जिम येथून जात होता. एका 20-25 वयोगटातील मुलाने इसमाच्या पाठीवर चाकूने वार करून जबरदस्तीने 4 ग्रॅम वजनाचे 10 हजार रुपये किमतीची सोनसाखळी आणि 5 ग्रॅम वजनाचे 12 हजार रुपये किमतीचे लॉकेट जबरदस्तीने लुटून पोबारा केला. या घटनेची नोंद डोंबिवली पोलीस ठाण्यात करण्यात आली असून अधिक तपास सुरु आहे.