डोंबिवली, २६ (प्रतिनिधी) : डोंबिवलीत चोरट्यांचा सुळसुळाट वाढला असून सोनसाखळ्याच्या चोऱ्या होत असताना आता अज्ञात चोरट्यांनी आपला मोर्चा रिक्षांकडे वळविला आहे. गेल्या आठवड्यात लागोपाठ दोन रिक्षांची चोरी झाली असून चोरट्यांनी कायदा सुव्यवस्था धाब्यावर बसविली आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार डोंबिवली पूर्वेतील आयरे रोडला असलेल्या दत्तनगर येथील रवींद्र महाजन निवास इमारतीत राहणारे विलास मोरे यांनी केलेल्या तक्रारी प्रमाणे गुरुवारी 20 तारेखेला रात्री 9 ते सकाळी 6 या दरम्यान पुर्वेकडील दत्तनगर येथील गावदेवी इंटरप्रायजेस समोरून २५ हजार रुपये किमतीची थ्री व्हीलर प्रवाशी रिक्षा क्र. एमएच-05/झेड-2628 इंजिन नं.एईएबीएमएच 76222 असलेली रिक्षा अज्ञात चोरट्याने पळविली.
तसेच दुसऱ्या घटनेत पश्चिमेतील गुप्ते रोडला जय हिंद कॉलनी राहणारे अरुण सिंग यांनी केलेल्या तक्रारी नुसार रविवारी 23 तारखेला भवानी सदन बिल्डिंगच्या पाठीमागे, जय हिंद कॉलनी, गुप्ते रोड, डोंबिवली पश्चिम येथून रुपये 60 हजार किमतीची रिक्षा क्र. एमएच-05/बीजी- 2058 इंजिन नं. 24 झेडडब्ल्यूडीएफ 49383 असलेली रिक्षा अज्ञात चोरट्याने पळविली.