डोंबिवली, २७ (प्रतिनिधी) : जीवनरंग ट्स्ट आय लीड ट्रेनिंग अँड कंसलटिंग व उमंग यांच्या संयुक्त विद्यमाने आयुष्य आनंदात जगण्याचे दहा प्रभावी मंत्र शिकवणारा “मस्त जगा” हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. भूतकाळातील साचलेल्या गोष्टी, नाते संबंधातील तणाव, अवघड बदलांना जुळवून घेणे, सदैव आनंदी राहणे व सातत्याने टिकवून ठेवणे असे आनंदी राहण्यास शिकवणारे मंत्र या “मस्त जगा” या कार्यक्रमात अतिश कुळकर्णी मार्गदर्शन करणार आहेत. सदरचा कार्यक्रम अँस्पा क्लास हाँल, मानपाडा रोड, कस्तुरी प्लाझा समोर शनिवार, दि. २९ जुलै २०१५ रोजी सायंकाळी विनामूल्य आयोजित केला आहे. इच्छुकानी ९८१४५३५३३ वर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.