मोहने येथे घरात चोरी करून पळणाऱ्या चोरट्याला पकडले
कल्याण : कल्याण नजीक असलेल्या मोहने येथे विजय नगर तांबे चाळीत राहणारा सुनील हिरोले हे काल रात्री घरात झोपले असताना एका चोरट्याने दरवाजावाटे घरात घुसून त्यांचा मोबाईल व रोकड असलेली पाकीट घेऊन पळून जाण्याच्या बेतात असतांना अचानक हिरोले जागे झाले त्यांनी आरडाओरड करत शेजारच्यांना जागे करत या चोरट्याचा पाठलाग करत त्याला पकडले. या चोरट्याने हिरोले यांच्यासह नागरिकांना शिवीगाळ करत धमकी दिली. हिरोले यांनी या चोरट्याला खडकपाडा पोलिसांच्या स्वाधीन केले असून पोलिसानी या चोरट्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. या चोरट्याचें नाव आकाश मेघानि असून तो मोहने परिसरात राहणारा आहे.
व्यपाऱ्याला सव्वा लाखांचा गंडा
कल्याण : कल्याण पश्चिमेकडील चिकन घर परिसरात साई भास्कर रेसिडन्सी मध्ये राहणारे शिरीष आहिरेकर हे व्यापारी आहेत. त्यांनी फेब्रुवारी महिन्यात कोलकत्ता येथील असित कुमार घोष यांना २० किलो कच्चा मालाची ऑर्डर दिली होती त्यामोबदल्यात आहिरेकर यांनी घोष याना 2 लाख 14 हजार 560 रुपये ऑनलाइनने ट्रान्फर केले होते. मात्र घोष यांनी अवघे तीन किलो कच्चा माल पाठवत उर्वरित 1 लाख ८२ हजार ३३६ रुपयांचा माल तर दिला नाही तसेच पैसेही परत केले नाहीत आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यामुळे याबाबत आहीरेकर यांनी या प्रकरणी खडकपाडा पोलीस स्थानकात तक्रार नोंदवली असून या तक्रारी नुसार पोलिसांनी असित कुमार घोष विरोधात गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरु केला आहे.
पुणे ते कल्याण प्रवासा दरम्यान महिलेचे दागिने लंपास
कल्याण : कल्याण पूर्वेकडील मलंग रोड नांदिवली परीसारतील अमृत पार्क येथे राहणारी महिला गेल्या महिन्यात २२ तारखेला पुण्याहून कल्याण येथे बस ने परतत असताना एका अज्ञात चोरट्याने हातचलाखीने या महिलेच्या बॅगेतील दागिने लंपास केले सदर बाब लक्षात येताच या महिलेने कोळशेवाडी पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली असून पोलिसांनी अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरु केला आहे.
दुचाकीच्या धडकेत ६ वर्षाचा मुलगा जखमी
कल्याण : कल्याण सह आसपासच्या परिसरात धूम स्टाईलने भरधाव वेगाने गाड्या चालवण्याचे प्रमाण वाढत असून अनेकदा यातून अपघात घडत आहेत. त्यातच मंगळवारी सायंकाळी अशाच भरधाव वेगाने चालवणाऱ्या दुचाकीने एका सहा वर्षाच्या मुलाला धडक दिल्याची घटना मोहने येथे घडली आहे.
कल्याण नजीक असलेल्या मोहने परिसरात नगरपालिका मराठी शाळेसमोर राहणारे सचिदानंद सूर्यवंशी हे आपल्या कुटुंबसह राहतात. सूर्यवंशी यांचा सहा वर्षाचा मुलगा रुद्र मंगळवारी घरासमोरील रोड वर खेळत असताना याचा परिसरात राहणारा जयेश पाटील हा आपली दुचाकी भरधाव वेगाने घेवून याच रस्त्यावरून जात होता. यावेळी दुचाकी वर नियंत्रण सुटल्याने त्याने रुद्रला जोरदार धडक दिली या धडकेत रुद्र जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत तर सूर्यवंशी यांनी या प्रकरणी खडकपाडा पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली असून या तक्रारी नुसार पोलिसांनी गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरु केला आहे.