सत्ताधारी प्रोग्रेसिव्ह पॅनल डोंबिवली जिमखाना पुन्हा बाजी मारणार !

डोंबिवली : शहरातील प्रसिध्द डोंबिवली जिमखान्याच्या व्यवस्थापक मंडळाची त्रैवार्षिक निवडूक येत्या 5 ऑगस्टला होत असून आजीव सदस्यांमधून 10 जागा असून त्याकरिता १७ उमेदवार रिंगणात उतरले आहेत. नेहमीप्रमाणे जरी ही निवडणूक चुरशीची होण्याची चिन्हे असली तरी मात्र सत्ताधारी प्रोग्रेसिव्ह पॅनल पुन्हा बाजी मारण्याची शक्यता आहे.

डोंबिवली जिमखान्याचे सुमारे १२०० आजीव सदस्य असून संस्थापक सदस्यांमधून 8 तर विश्वस्त सदस्य 1 असे 9 सदस्यांची निवड झाली आहे. आता आजीव सदस्यामधून 10 सदस्य निवडायचे असून यासाठी 16 सदस्य मैदानात उतरले आहेत. सत्ताधारी प्रोग्रेसिव्ह पॅनलने तर्फे दिपक मेजारी, डॉ. प्रमोद बाहेकर, दिलीप भोईर, आनंद डिचोलकर, महेंद्र संचेती, डॉ. विश्वास पुराणिक, डॉ. दामोदर नंदा, महेंद्र मोकाशी, साहिल जोशी, श्रीपाद कुलकर्णी असे 10 उमेदवार असून इतर 6 उमेदवारांमध्ये केदार भाट्ये, हेमंत दातार, भारत एडके,  सुधीर खरे, धनंजय कुडाळकर, संदीप म्हापसेकर अशी चुरशीची निवडणूक 5 तारखेला सकाळी 8 ते दुपारी 2 पर्यत मतदान जिमखान्यात होणार आहे. मतदान संपल्यानंतर मतमोजणी होणार असून रात्रीपर्यत निकाल जाहीर होतील.