जुनी डोंबिबली येथील रस्ते आणि स्वच्छता मनाला प्रसन्न करते ! ( खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचे प्रतिपादन )

डोंबिवली : कल्याण डोंबिबली महानगरपालिका प्रशासनाच्या कारभारावर अनेक नेत्यांनी ताशेरे ओढलेले आहेत. स्वच्छ आणि सुंदर याविषयावर अनेकांनी फटकारेही मारले आहेत. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनीही घाणेरडी डोंबिबली अशी टीका-टिपणी केली आहे. परंतु अशा परिस्थितीत आपला प्रभाग स्वच्छ आणि सुंदर ठेवण्याचं काम माजी जेष्ठ नगरसेवक विश्वनाथ राणे यांनी केलं आहे. त्याची प्रचितीही खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या वक्तव्यातुन दिसून आली. जुनी डोंबिबली मध्ये आलं की रस्ते आणि स्वच्छता पाहून मन प्रसन्न होत असे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी उपस्थित जुनी डोंबिवलीकर नागरिकांसमोर सांगितले. खासदार डॉ. शिंदे शिवसेनेच्या 56 व्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाला आले होते.

प्रभाग क्र. 30च्या माध्यमातून जनगणमन शाळेत सभामंडपात शिवसेनेच्या 56 व्या वर्धापन दिनानिमित्त विनामूल्य वह्या वाटप उपक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी व्यासपीठावर खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, शिवसेना शहरप्रमुख राजेश मोरे, उपजिल्हाप्रमुख राजेश कदम, जेष्ठ नगरसेवक विश्वनाथ राणे, सागर जेधे, माजी महापौर विनिता राणे, माजी नगरसेवक संगीता पाटील, समाजसेवक मुकेश पाटील आदी उपस्थित होते.

यावेळी डॉ. शिंदे यांनी सांगितले की, येथील विकास काम नियोजन पद्धतीचे आहे. वेळोवेळी नागरिकांच्या समस्या तसेच त्यांच्याशी विचार विनिमय करून विकास कामांची आखणी केली गेली असल्याने प्रभाग स्वछ दिसत आहे. अंतर्गत काँक्रीट रस्ते आणि भूमिगत गटारे यामुळे प्रभाग स्वच्छ आहे. विशेष म्हणजे राणे यांचा अभ्यास आणि प्रशासनावर असलेली पकड येथील स्वच्छता राखण्यास कामी येते. प्रभागात नेहमी सांस्कृतिक कार्यक्रमा करताना येथील सुशिक्षित नागरिक आणि शिवसेनेचे निष्ठावंत कार्यकर्ते यांचा चांगला समन्वय विश्वनाथ राणे यांनी राखला आहे.

वर्धापन दिनानिमित्त यावेळी 2000 मुलांना विनामूल्य वह्या वाटप करण्यात आले. सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाखाप्रमुख अजय पांचाळ, शाखाप्रमुख धनाजी चौधरी, डोंबिवली शहर युवा सेना समन्वयक प्रतिक राणे तसेच शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी विशेष मेहनत घेतली.