हॉटेलमध्ये चोरी, बनावट चावीने उघडले लॉकर

डोंबिवली : बनावट चवीने हॉटेलचे लॉकर उघडून त्यातील ८०,२७५ रुपये इतकी रोख रक्कम चोरल्याची घटना सोमवारी पहाटेच्या डोंबिवली पूर्वेकडील एका हॉटेलमध्ये घडली. याप्रकरणी हॉटेलचे व्यवस्थापक अमित वाल्मिकी यांनी डोंबिवली रामनगर पोलीस ठाण्यात अज्ञात एसमाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, डोंबिवली पूर्वेकडील चिपळूणकर मार्गावरील रामनगर येथील डॉमिनोज पिझ्झा हॉटेलमध्ये सोमवारी पहाटेच्या सुमारास चोरट्याने शटर उचकडून बनावट चवीने लॉकर उघडले. लॉकरमध्ये ठेवलेले ८०,२७५ रुपये घेऊन पसार झाला. चोरट्याने तोंडावर रुमाल लावला होता. या प्रकरणी डोंबिवली रामनगर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.