डोंबिवलीत प्लाझ्मा रक्तपेढी पुरविते 124 थॅलेसेमिया रुग्णांना रक्त !

( वाढदिवसानिमित्त पाटील कुटुंबियांचा रक्तदान उपक्रम )

डोंबिवली : “रक्तदान दान हेच श्रेष्ठ दान”  या उक्तीनुसार आजही काही कुटुंब या विषयी अभिनव उपक्रम करीत आहेत. डोंबिवलीत पाटील कुटुंबीयांनी मुलाच्या वाढदिवस निमित्त भव्य रक्तदान शिबीर आयोजित केले होते. प्लाझ्मा रक्तपेढी माध्यमातून हा उपक्रम यशस्वी झाला. डोंबिवलीत प्लाझ्मा रक्तपेढी 124 थॅलेसेमिया रुग्णांना रक्त पुरवित असते. रक्तचा मागणी मोठी असल्याने पुरवठा कमी पडू नये म्हणून असे उपक्रम प्लाझ्मा करीत असते. याचाच भाग म्हणून प्रथम विश्वनाथ पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त हा उपक्रम झाला. प्रथम पाटील यास शुभेच्छा देत रक्तदान शिबिर यशस्वी झाले असे प्लाझ्मा रक्तपेढीचे डॉ. सिद्धेश यांनी सांगितले.

याबाबत डॉ.  सिद्धेश म्हणतात थॅलेसेमिया हा अनुवंशिक रक्त विकार आहे.  हे सामान्य हिमोग्लोबिन तयार करण्याच्या व्यक्तीच्या शरीराच्या क्षमतेवर परिणाम करते.  हिमोग्लोबिन हे लाल रक्तपेशींमध्ये आढळणारे एक आवश्यक प्रथिन आहे. हे तुमच्या लाल रक्तपेशींना तुमच्या शरीरात ऑक्सिजनची वाहतूक करण्यास अनुमती देते, तुमच्या शरीरातील इतर पेशींचे पोषण करते. एखाद्या व्यक्तीला थॅलेसेमिया असल्यास, त्याचे शरीर कमी निरोगी हिमोग्लोबिन प्रोटीन तयार करते आणि त्याच्या अस्थिमज्जामध्ये कमी निरोगी लाल रक्तपेशी निर्माण होतात. प्लाझ्मा रक्तपेढी माध्यमातून 124 थॅलेसेमिया रुग्णांना दर महिना विनामूल्य रक्त देते. त्यामुळे रक्ताचा तुटवडा फार असतो. रक्तदान हे सामाजिक कार्य आहे. लोकही यासाठी चांगला प्रतिसाद देतात.

यावेळी प्रथम पाटील यांचे आई ऍड. विनया पाटील व वडील विश्वनाथ पाटील यांनी या उपक्रमात सहभागी झालेल्या रक्तदात्यांचे आभार मानले. यावेळी विनया पाटील म्हणाल्या, तरुण पिढीसाठी एक आदर्श निर्माण व्हावा म्हणून हा उपक्रम हाती घेतला. वाढदिवस सर्वच साजरे करतात पण यात एक वेगळेपण आहे. सामाजिक बांधिलकी आणि त्याबरोबर एक चांगला संदेश म्हणून रक्तदान शिबिर आयोजित केले. ,लोकांनीही याला उत्स्फूर्तपणे साथ दिली. चांगल्या संख्येने रक्त पिशव्या जमा झाल्या या कार्यासाठी सर्वांचे आभार.

सदर रक्तदान शिबिर यशस्वी करण्यासाठी प्लाझाचे पदाधिकारी नीलम शहा, रवी निमसे, डॉ. सिद्धेश, रुपाली पाटील, वैदेही, भाग्यश्री, प्रसाद, सारिका यांनी विशेष मेहनत घेतली.