( भाजपा कार्यकर्त्यांचा आनंदी सोहळा )
डोंबिवली : पूर्वेकडील भाजप पूर्व मंडल कार्यालयाच्या प्रांगणात भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते आणि डोंबिवलीकरांनी आनंदी सोहळा साजरा केला. मुंबईत आझाद मैदानात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमितभाई शहा यांच्या साक्षीने महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस तथा देवाभाऊ यांचा शपथविधी संपन्न झाला.

या मंगलमय समारंभासाठी जल्लोष करीत डोंबिवलीत भाजपा कार्यकर्त्यांनी फटाक्यांच्या आतषबाजी सह ढोल-ताशा-बँड तालावर नाचत-गात आनंदी सोहळा साजरा केला.

लाडक्या बहिणींचा लाडका ‘देवा भाऊ’ म्हणजेच देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी 5 तारखेला मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. महाराष्ट्र राज्यात पुन्हा महायुतीचे सरकार स्थापना झाले. यापूर्वी सलग पाच वर्ष राज्याचा कारभार सांभाळलेल्या देवा भाऊ यांना जननेते मुख्यमंत्री पदावर बसवील्याने राज्यभर आनंद व्यक्त झाला. डोंबिवलीत भारतीय जनता पार्टी कार्यालयाजवळ फटके वाजवत बँडबाजाच्या गजरात कार्यकर्त्यांनी जल्लोष केला.

यावेळी कल्याण लोकसभा निवडणूक प्रमुख शशिकांत कांबळे, कल्याण जिल्हा सरचिटणीस नंदू परब, डोंबिवली पूर्व मंडळ अध्यक्ष मुकुंद ( विशू ) पेडणेकर, महिला आघाडी प्रमुख पूनम पाटील, युवा मोर्चाचे मितेश पेणकर, बाळा पवार यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.