( उकाड्याने हैराण झालेले लोक सुखावले )
डोंबिवली : उकाड्याने हैराण झालेल्या डोंबिकरांना संध्याकाळी उकाड्यापासून सुस्कारा सोडला. संध्याकाळी अचानक आलेल्या पावसाने सर्वांनाच आनंदी केले. दुपारपासून पाऊस पडणार अशी लक्षणे हवामानात झालेल्या बदलामुळे डोंबिवलीकरांना कळून चुकली होती. त्याचप्रमाणे संध्याकाळी साधारण पावणेसहाच्या सुमारास पावसाचे आगमन झाले. मात्र नेहमीप्रमाणे वीज वितरण कंपनीला पावसाची असलेल्या भितीनुसार बत्ती गुल झाली. परतू विजेचे पर्वा न करता डोंबिवलीकरांची पावसाचा आनंद घेतला.
पहिल्याच पावसाचे आगमन म्हणून तुरळक पावसाने आगमन झाले. मात्र थोड्याच वेळात पावसाने जोर धरला आणि पाऊस सरीवरसरी पडत राहिला. पहिल्याच पावसात आनंदाने पावसात भिजणाऱ्या लोकांची संख्या मोठी दिसून आली. पहिल्याच पावसात मुलांनी आनंदाने भिजवून घेतले. वातावरणात काही प्रमाणात आलेला थंडावा सर्वांना सुखावह असाच होता. आनंदाने सर्व जण ओलेचिंब होताना दिसून आले. थोड्याप्रमाणात मात्र रस्त्यावरील दुकानदारांची पंचायत झाली. बाहेर ठेवलेले सामान आत घेण्यात दुकानदारांची गडबड दिसून आली. पहिलाच पाऊस अंगावर पडण्यासाठी महिलावर्गही पुढे असल्याचे दिसून आले. कोणालाच पाऊस पडले याची कल्पना नसल्याने रस्त्यावरील वाटसरू विना छत्री जात होते. त्यामुळे भिजण्याशिवाय पर्याय नव्हता. डोंबिवली शहराच्या काही विभागात मात्र पहिल्याच पावसाच्या तडाख्यात विजेचे ट्रान्सफॉर्मर बंद पडल्याने बत्ती गुल झाल्याच्या तक्रारी येत होत्या. पहिल्याच पावसाचा परिणाम डोंबिवली महिला महासंघाच्या कार्यक्रम झाला. कार्यक्रम दरम्यान बत्ती गुल झाल्याने कार्यक्रमात विघ्न आले. परंतु नंतर कार्यक्रम सुरू झाला. तरीही अशा परिस्थितीत सर्वांनी पावसाचा आनंद घेतला.
