शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातर्फेएकदिवसीय भव्य मोफत आरोग्य शिबीर

डोंबिवली : हिंदूहृदयसम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दीचे औचित्य साधून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे शिवसैनिक किरण मोहन म्हात्रे आणि वैशाली किरण म्हात्रे यांच्या तर्फे एकदिवसीय भव्य मोफत आरोग्य शिबीर आयोजित केले होते.

सदर शिबिर पिंटू भास्कर म्हात्रे चाळ, नीलकमळ बंगल्याजवळ, उमेशनगर डोंबिवली पश्चिम येथे झाले.  रविवार दि. ५ जुलै रोजी पार पडलेल्या या शिबिराचा फायदा शेकडो डोंबिवलीकरांनी घेतला.

या आरोग्य शिबिरात स्टार, पर्सोल अँड सी हेल्थ इन्शुरन्स तसेच आरोग्य विमा विभाग – फोर्टिस हॉस्पिटल्स माध्यमातील डॉक्टरांकडून तपासणी करण्यात आली. शिबिरामध्ये डॉ. भूषण भंडारी, प्रणाली साळवे, प्रथमेश कौशिकर, माधवी वरीक, डॉ. अगरवाल, पल्लवी, सूर्यप्रकाश तिवारी यांनी शिबिरात वैद्यकीय तपासणी केली. यामध्ये ब्लड शुगर, ब्लड प्रेशर, उंची आणि वजन तपासणी, डोळ्यांची तपासणी, ईसीजी विषयी अनुभवी डॉक्टरांचा सल्ला शिबिरातील उपस्थित लोकांना मिळाला.

यावेळी जिल्हाप्रमुख अभिजीत सावंत, संपर्क प्रमुख संदीप भालेकर, संपर्क प्रमुख राजू पवार, उपशहर प्रमुख प्रमोद कांबळे, उपशहर प्रमुख राहुल चौधरी, उपसंघटिका निशा रेडीज आदी उपस्थित होते. सदर शिबिर यशस्वी करण्यासाठी समस्त पदाधिकारी, महिला आघाडी, युवासेना व शिवसैनिक यांनी विशेष मेहनत घेतली.