वामन म्हात्रे फाऊंडेशनच्या वतीने मोफत छत्री वाटप

डोंबिवली : शहरातील वामन म्हात्रे फाउंडेशनच्या माध्यमातून तसेच भाजप प्रदेशाध्यक्ष तथा स्थानिक आमदार रवींद्र चव्हाण आणि भारतीय जनता पक्ष पश्चिम मंडळ यांच्या मार्गदर्शनाखाली डोंबिवली पश्चिमेकडील अनमोल नगरी येथील जनसंपर्क कार्यलयात मोफत छत्री वाटप करण्यात आले. यावेळी कल्याण जिल्हा उपाध्यक्ष भाजपा युवा मोर्चा
अनमोल वामन म्हात्रे, अश्विनी अनमोल म्हात्रे यासह भाजपा डोंबिवली पश्चिम मंडळ अध्यक्षा प्रिया जोशी, संदीप ( रमा म्हात्रे ) यांसह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.