शिवसेना पक्ष आणि योगेंद्र भोईर फौंडेशन यांच्यातर्फे मोफत वह्या आणि छत्री वाटप

डोंबिवली : पश्चिमेत शिवसेना पक्ष आणि योगेंद्र भोईर फौंडेशन यांच्यातर्फे मोफत वह्या आणि छत्री वाटप करण्यात आले. तब्बल पाच हजार गरजू विद्यार्थ्यांना वह्या वाटप करण्यात आल्या. तर जेष्ठ नागरिकांना छत्री वाटप करण्यात आली. या कार्यक्रमला विद्यार्थी आणि जेष्ठ नागरिक यांनी गर्दी केली होती. यावेळी शिवसेना पदाधिकारी योगेंद्र भोईर म्हणाले की, डॉ. खासदार श्रीकांत शिंदे नेहमीच विद्यार्थी आणि जेष्ठ नागरिक यांना मदत करत असतात. तसेच आम्हीही सामाजिक बांधिलकी जपत विविध उपक्रम राबवत असतो. तसेच आमदार सचिन अहिर यांच्या शिवसेना प्रवेशावर प्रतिक्रिया देताना भोईर यांनी सांगितले की आमचे मुख्यनेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अजून किती षटकार मारतील हे येत्या काळात सर्वांना समजेल.