शहर पथ विक्रेता समिती निवडणूक येत्या  १८ तारखेला

डोंबिवली : पथविक्रेता उपजीविका संरक्षण व पथविक्री विनियमन अधिनियम २०१४ आणि २०१८ मधील नियमांनुसार कल्याण डोंबिवली महानगरपालिका शहर पथ विक्रेता समिती निवडणूक २०२६  येत्या  १८ तारखेला होतबाहे. एकूण दहा प्रभागात निवडणूक निर्णय अधिकाऱ्याच्या देखरेखीखाली पार पडणार आहे. या निवडणूकित ९५३१ नोंदणीकृत फेरीवाले निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावणार आहेत. विशेष म्हणजे हि पालिकेतील पहिली निवडणूक बॅलेट पेपरवर होणार आहे.

या निवडणुकीत भीमशक्ती शिवशक्ती कष्टकरी होकर्स पॅनल व धडाकेबाज पथविक्रेता पॅनल असे दोन पॅनल समोरासमोर उभे आहेत. या निवडणुकीत एकूण आठ जागाकरीता निवडणूक होणार आहे. या निवडणुकीत राखीव प्रवर्गातील बिनविरोध उमेदवार रेखा अशोक सोनवणे (अनुसूचित जाती – महिला ), आरती अशोक पोटावे अनुसूचित – जमाती ), प्रशांत शांताराम माळी (इतर मागास प्रवर्ग ), आशा किशोर मगरे ( अल्पसंख्याक – माहिला ) आणि रघुनाथ बाळू भोईर (विकलांग – दिव्यांग ) असे बिनविरोध निवडणून आले आहेत.

आता तीन जागांकरता हि निवडणूक होणार आहे. यात भीमशक्ती शिवशक्ती कष्टकरी होकर्स पॅनल व धडाकेबाज पथविक्रेता पॅनलमधून भालचंद्र (भाऊ ) पाटील, नाना पाटील, महिला आरक्षणातून दर्शना गायकवाड तर धडाकेबाज पथविक्रेता पॅनल मधून अभयलाल दुबे, राजू गुप्ता आणि महिला आरक्षणातून देवकानंद नंदू जाधव हे उमेदवार रिंगणात आहेत. या निवडणुकीत जास्तीत जास्त नोंदणीकृत फेरीवाल्यांनी मतदान करावे असे आवाहन दोन्ही पॅनल मधून करण्यात आले आहे.