कोपरगावात दहीहंडी उत्सवाचा जल्लोष

डोंबिवली : कोपरगावातील नागरिकांना दहीहंडी उत्सवाचा आनंद आपल्या परिसरातच घेता यावा आणि वाहतूक कोंडीचा त्रास होऊ नये या उद्देशाने २००७ पासून येथे दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात येत आहे. शिवसेना कोपरगाव, वॉर्ड क्र. ६५ दहीहंडी उत्सव संजय लक्ष्मण पावशे (शाखाप्रमुख) अपर्णा संजय पावशे (माजी शाखाप्रमुख – महिला आघाडी) आणि समस्त पदाधिकारी, महिला आघाडी आणि शिवसैनिक शिवसेना शाखा कोपरगाव व लक्ष्मण कृष्णा पावशे सामाजिक संस्था यांच्या वतीने आयोजित या उत्सवात दरवर्षी गोविंदा पथकांसह विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सन्मान करण्यात येतो. हंडीला सलामी देणाऱ्या गोविंदांसाठी  १० ते १५ ट्रॉफी तसेच सुमारे १०० सन्मानचिन्ह मान्यवरांच्या हस्ते देण्यात आली.

८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण या विचारानुसार सामाजिक व सांस्कृतिक उपक्रम राबविले जात असल्याचे माजी नगरसेवक संजय पावशे यांनी सांगितले. गणेशोत्सव, नवरात्रोत्सव, दहीहंडी तसेच राष्ट्रीय सणांच्या माध्यमातून संस्कृतीचे जतन करण्याचा प्रयत्न करतो.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, जिल्हाप्रमुख गोपाल लांडगे आणि आमदार राजेश मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम होतो.