प्रभागाना स्वतंत्र निधीची तरतूद असावी
—– खुशबू चौधरी
डोंबिवली, दि. ११ (प्रतिनिधी) : महानगरपालिकेत परिवहन समिती, शिक्षण समितीसाठी अर्थसंकल्पात तरतुद असते. मात्र प्रभागानुसार स्वतंत्र निधीची तरतूद असणे आवश्यक आहे. अशा प्रकारचा निधी मिळविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे नगरसेविका खुशबू चौधरी यांनी सांगितले. आज पालिकेच्या डोंबिवलीतील विभागीय कार्यालयातील “फ” प्रभाग क्षेत्र सभापती पदभार स्वीकारल्यानंतर त्यांनी आपल्या कार्यविस्ताराबत विशेष माहिती दिली.
यावेळी माजीमंत्री जगन्नाथ पाटील, शशिकांत कांबळे, माजी सभापती राजन आभाळे, नगरसेवक संदीप पुराणिक , निलेश म्हात्रे, विनोद काळण, पदाधिकारी मनीषा राणे, वर्षा परमार यांसह कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सभापती पदभार स्वीकारल्यानंतर नगरसेविका खुशबू चौधरी म्हणाल्या, मला हे पद मिळाल्याबद्दल भाजपचे आभार मानते. प्रभागाचा अधिकाधिक विकास होण्यासाठी अर्थसंकल्पात प्रभागानुसार स्वतंत्र निधीची तरतूद असला पाहिजे. पालिकेच्या अनेक वास्तू धूळखात पडल्या आहेत. या वास्तूंचा विकास कामांसाठी वापर झाला पाहिजे. माझ्या या पदाचा कार्यकाल कमी असला तरी असला तरी समस्या सोडवण्याचा पूर्णपणे प्रयत्न करीन. कचरा हा प्रश्न गंभीर असून यासाठी सेवा भावी संस्थाबरोबर हा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करीन. यावेळी उपमहापौर मोरेश्वर भोईर, मनसे गटनेते मंदार हळबे, भाजप गटनेते वरुण पाटील, माजी आमदार रमेश पाटील , भाजपा पदाधिकारी महेश पाटील, डोंबिवली शिवसेना शहरप्रमुख भाऊसाहेब चौधरी , डोंबिवली मनसे शहराध्यक्ष मनोज घरत, नगरसेवक विश्वजित पवार यांनी नगरसेविका खुशबू चौधरी यांना शुभेच्या दिल्या