प्रकाश गोविंद म्हात्रे यांची अध्यक्षपदी निवड

डोंबिवली, दि. २१ (प्रतिनिधी) : डोंबिबली ग्रामिण विभागातील प्रसिद्ध तिर्थक्षेत्र श्री पिंपलेश्र्वर मंदिर विश्वस्त मंडळाची पंचवार्षिक निवडणूक नुकतीच पार पडली. या निवडणुकीत माजी जिल्हा परिषद सदस्य तथा शिवसेना नेते प्रकाश गोविंद म्हात्रे यांची सर्वानुमते अध्यक्षपदी निवड करण्यात आली.

यामध्ये ऊपाध्यक्ष – रतन चांगो म्हात्रे, सचिव – पंढरीनाथ मंगल पाटील, सहसचिव – अरूण जगन्नाथ पाटील, खजिनदार – गजानन आंबो म्हात्रे, सहखजिनदार – रघुनाथ भिवा पाटील यांची एकमताने बिनविरोध निवड झाली. मंडळाच्या या निवडणुकीसाठी निवडुन निर्णय अधिकारी म्हणून रामकृष्ण पाटील व वसंत पाटील यांनी काम पाहीले. तर कार्यकारिणी सदस्य  म्हणून इतर सात सदस्यांनी निवड करण्यात आली. एकुण तेरा सदस्यांची कार्यकरणीत निवड करण्यात आली आहे. सदर कार्यकारिणी सन २०१७ ते २०२२ पर्यंत पाच वर्षांच्या कालावधी करीता निवडण्यात आली असून निवडणुकीचा कार्यक्रम अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात पार पडला.