डोंबिवली, २७ (प्रतिनिधी) : सोनसाखळ्या आणि मंगळसूत्र लुबाडून पोबारा करण्याचे प्रकार होत असतना बुधवारी पुन्हा पूर्वेकडील टिळक रोडला असलेल्या ब्राह्मणसभा हॉलसमोर विविहीत महिलेचे मंगळसूत्र धूम स्टाईलने लांबवून चोरट्याने पोबारा केला.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार पूर्वेकडील आगरकर रोडवरील प्रशांती सोसायटीमध्ये राहणारी गृहिणी बुधवारी रात्री साडेनऊच्या दरम्यान दही-दुध आणण्यासाठी दुकानातून ब्राह्मणसभा हॉलसमोरुन घरी पायी जात होती. दरम्यान मोटार सायकलवरून आलेल्या दोन अनोळखी तरुणातील पाठीमागे असलेल्या इसमाने पायी चालत असलेल्या त्या गृहणीच्या गळ्यावर जोरात थाप मारून तिच्या गळ्यातील 4 तोळे वजनाचे 60 हजार रुपये किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र चोरून पोबारा केला. या घटनेची नोंद डोंबिवली पोलीस ठाण्यात करण्यात आली असून सहाय्यक पोलीस उप निरीक्षक ठोकले अधिक तपास करीत आहेत.