प्रख्यात तबला वादक पंडित सदाशिव पवार यांचे निधन

डोंबिवली, दि. ७ (प्रतिनिधी) : संगीत क्षेत्रातील प्रसिद्ध व्यक्तिमत्व आणि नामवंत तबलावादक पं. सदाशीव पवार यांचे काल अल्पशा आजाराने निधन झाले. मृत्यू समयी ते ८४ वर्षांचे होते.

पूर्वेकडील राजाजी पथावरील मढवी अवंतिका अपार्टमेंट मधील “सी” विंग मधील दुसऱ्या मजल्यावर ते रहात होते. आज सकाळी त्यांचा राहत्या घरातून अंत्ययात्रा निघाली त्यावेळी महापालिका विरोधी पक्ष नेते मंदार हळबे, शिवसेना शहरप्रमुख भाऊसाहेब चौधरी, भाजपा पूर्व मंडल अध्यक्ष संजीव बीडवडकर, निर्माता तथा शिवसेना विभागप्रमुख किशोर मानकामे, माजी नगरसेवक वसंत भगत, गणेश मंदिर संस्थांचे प्रवीण दुधे, संगीत क्षेत्रातील प्रवीण करकरे, रवी पोक्षे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. रामनगर येथील मोक्षधाम स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पाश्च्यात त्यांची पत्नी, निषाद व रूपक हे दोन मुलगे आहेत.