धूम स्टाईल ने मोबाईल लंपास
कल्याण : कल्याण पूर्वेकडील टाटा पावर नेताजी नगर येथे राहणारे सागर साळुंके काळ दुपारी पावणे तीन वाजण्याच्या सुमारास टाटा नाका येथून घराच्या दिशेने जात असतना फोन वरून बोलत पायी चालत होते. या दरम्यान दोन जन एका भरधाव दुचाकीवर आले त्यांनी सागर च्या हातातील २० हजार रुपयांचा मोबाईल हिसकावून पळ काढला. या प्रकरणी सागर याने मानपाडा पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली असून या तक्रारी नुसार पोलिसांनी अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरु केला आहे.
डोंबिवलीत दोन घरफोद्या
डोंबिवली : पूर्वेकडील कांचन गाव येथे अंबर ह्र्मोनी येथे राहणारे विजय पवार हे आपल्या राहत्या घराला कुलूप लावून मंगळवारी रात्री कामामानिमित्त बाहेरगावी गेले होते. घराला कुलूप असल्याची संधी साधत अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घराच्या गलरीतून घरात प्रवेश करत घरातील ८ हजारांची रोकड लंपास केली तर त्यांच्या शेजारी राहणाऱ्या घरात हि गलरी तून प्रवेश करत त्यांच्या घरातील रोकड व चैन असा मिळून एकूण २७ ह्जारंचा मुद्देमाल लंपास केला. या प्रकरणी पवार यांनी टिळकनगर पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली असून या तक्रारी नुसार पोलिसांनी अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरु केला आहे.