राँयल स्कुल मध्ये बालमहोत्सवाचे आयोजन

डोंबिवली : युवक एज्युकेशन ट्स्ट संचालित राँयल इंटरनँशनल यांच्या सौजन्याने राँयल स्कुल येथे नुकताच दोन दिवसीय बालमहोत्सव आयोजित केला होता. महोत्सवात ६०० पेक्षा जास्त विद्यार्थ्यी आणि माध्यमिक व प्राथमिक सुमारे ७० शाळाचे विद्यार्थी सहभागी झाले होते. बालमहोत्सव म्हणजे खास बालकासाठी केलेला उत्सव प्रेरणा, त्यांच्या कलागुणांना सुवर्ण संधी संस्थेचे अध्यक्ष रजनीकांत शहा. या उत्सवास संस्थेच्या पुजा शहा, मख्याध्यापिका राखी मँडम व राँयल काँलेजचे प्राचार्य डॉ. विवेक पाटील आदि मान्यवर उपस्थितीत राहून मार्गदर्शन केले.

बालमहोत्सवचा हेतू की, शाळेतील विद्यार्थ्यांना त्यांच्या कलागुणांना वाव मिळावा, अत्मविश्वास वाढवा म्हणून हा उपक्रम राँयल स्कुल ने २०१२-१३ या शैक्षणीक वर्षापासून सुरू केला व त्याला चागंला प्रतिसाद मिळत आहे असे पुजा शहाने मार्गदर्शन करतांना म्हणाल्या, सदर महोत्सवात वेशभूषा, रंगभरणे, चित्रकला, बूध्दीबळ स्पर्धा, टाकाऊपासून टिकाऊ वस्तुचे मार्गदर्शन इत्यादी स्पर्धा आयोजित केल्या होत्या. बालमहोत्सवाची सुरुवात स्काऊट गाईडच्या संचलनाने झाली. स्पर्धेसाठी कोणतेही मुल्य नव्हते. मात्र सर्व सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र आणि विजयी मुलांना रोख रक्कमेची पारितोषिके व सहभागी शाळांना फिरता चषक देण्यात आला. उपस्थित मान्यवर अमोल पाटील, संजीवनी तांडेल, अमर मोरे यांनी महोत्सवा यशस्वी करणाऱ्यांचे कौतुक करून शुभेच्छा दिल्या.