डोंबिवली : शिव कावडीयाँ सेवा संघ व तिर्थक्षेत्र श्री पिंपलेश्वर मंदिर आयोजित श्रीपिंपलेश्वर मंदिर ते अंबरनाथ शिव मंदिर कावड यात्रेचे आयोजन करण्यात आले होते.
हींदु धर्म प्रचारक आचार्य जोशीजी महाराज, हिंदी भाषिक जनता परिषदचे प्रमुख विश्वनाथजी दुबे, श्री पिंपलेश्वर मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष प्रकाश म्हात्रे या मान्यवरांच्या उपस्थितीत कावड पुजन करून कावड यात्रेची सुरवात करण्यात आली. यावेळी हजारो शिव कावडीयाँ भक्त उपस्थितीत होते. मोठया भक्तिभावाने ‘बंम् बंम् भोलेनाथ’ या मंत्रांचा जयघोष करत कावड यात्रा मार्गस्थ झाली.