भगवामय वातावरणात डोंबिवलीत ‘भगवा पंधरवड्याचा’ शुभारंभ

डोंबिवली : शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त डोंबिवलीत रविवार 14 तारखेपासून भगवामय वातावरणात ‘भगवा पंधरवडयाला शुभारंभ झाला, रविवारी उपजिल्हाप्रमुख सदानंद थरवळ यांचे हस्ते रविवारी मतदार नोंदणी अभियान सुरु करण्यात आले तर आज कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे यांच्या हस्ते शिवसेना सदस्य नोंदणी अभियानाला सुरवात झाली.

यावेळी सदस्य नोंदणी प्रसंगी सांगितले कि, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आवाहनाप्रमाणे माझा महाराष्ट्र, भगवा महाराष्ट्र हे अभियान महाराष्ट्रामध्ये फगवा पंधरवडा म्हणून साजरा करण्यात येणार आहे. आज शहर शाखेच्या माध्यमातून सदस्य नोंदणी अभियान सुरु झाले आहे.  शाखेच्या भरगच्च कार्यक्रमात मतदार नोंदणी, सदस्य नोंदणी, गटप्रमुख, पदाधिकाऱ्यांची यादी याशिवाय नागरीकांसाहित विदिध कार्यक्रम असून संपूर्ण वातावरण भगवे निर्माण होणार आहे.

तर यावेळी राजेश मोरे म्हणाले, 14 तारखेपासून पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या वाढदिवसापर्यत म्हणजे 27 तारखेपर्यत विविध उपक्रम आयोजित करण्यात आले असून यामध्ये गुरुपौर्णिमे निमित्त ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार, अपंग ज्येष्ठ नागरिक असलेल्या भरारी संस्थेला भेट, वृक्षारोपण, विद्यार्थी गुणगौरव, आरेाग्य शिबिर, हिंदू हृदयसम्रट बाळासाहेब ठाकरे अकादमीची पूर्वपरिक्षा, महिलांसाठी चित्रकला व रांगोळी स्पर्धा, स्वच्छता अभियान, भजन स्पर्धा, कर्णबधिर मुलांना साहित्य वाटप करण्यात येणार आहे. सोमवारी सदस्य नोंदणी अभियानानिमित्त डोंबिवलीत विविध भागात शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी सदस्य नोंदणी अभियान राबवले त्याला नागरिकांचा उत्सफूर्त प्रितसाद मिळाला. यावेळी महापौर विनिता राणे, तात्यासाहेब माने, किशोर मानकामे, संजय पावशे, प्रकाश तेलगोटे, मंगला सुळे, वैशाली दरेकर-राणे, कविता गावंड आदी पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.