आंतरशालेय  मिनी मॅरेथॉन स्पर्धेत कल्याणच्या सेंट्रल रेल्वे शाळेची बाजी

डोंबिवली : डोंबिवलीतील शिवाई बालक मंदिर स्ट्रस्टने आयोजित केलेल्या १८ व्या कल्याण तालुका आंतरशालेय मिनी मॅरेथॉन स्पर्धेत धुवादार पावसाची तमा न बाळगता सुमारे साडेचार हजार विद्यार्थ्यानी भाग घेतला. सदर सपर्धा डोंबिवलीत क्रीडा संस्कृती रूजुन तिचे संवर्धन व्हावे, विद्यार्थ्यांमध्ये यशस्वी होण्याची जिद्द निर्माण व्हावी या उद्देशाने आयोजित करण्यात येते. या स्पर्धेत आठ गटामध्ये मुलां-मुलींच्या 11 गटात कल्याणच्या सेंट्रल रेल्वे शाळेतील विद्यार्थ्यानी चमकदार कामगिरी करुन 11 पारितोषिके पटकावली कल्याण तालुक्यातील 75 शाळांतील सुमाळांरे 4500 विद्यार्थ्यानी या स्पधेत भाग धेतला.

कल्याण डोंबिवली महापालिकेच्या सावळाराम म्हात्रे क्रीडा संकुलाच्या मैदानावर आज सकाळी ही स्पर्धा संपन्न झाली. सकाळ पासूनच शालेय विद्यार्थी स्पर्धक क्रमांक लावून शाळेच्या मैदानावर उपस्थित रुजू झाले होते. मुला-मुलींच्या आठ-आठ गटात धावण्याची स्पर्धा घेण्यात आली. मुलांच्या 15 ते 18 वयोगटातील राकेश यादव (प्रथम) शुभम यादव (व्दितीय) तर मुलींच्या गटात स्नेहा खुशवाह (सेंट्रल रेल्वे कनिष्ठ महाविद्यालय) आणि मानसी यादव (सेंट्रल रेल्वे माध्यमामिक) या पाच विद्यार्थ्यानी पारितेषिके पटकावून शाळेला पदक मिळवून दिले. इतर सहा गटातील याच शाळेतील विद्यार्थ्यानी पारितोषिेके पटकावले. तसेच मुक बधिर शाळेच्या स्पर्धेत डोंबिवलीतील अस्तित्व शाळेने एकूण तीन पारितोषिके पटकावून शाळेला यश मिळवून दिले. राज्यमंत्री रवींद्र चव्हाण, महापौर विनिता राणे, गटनेते मंदार हळवे, नगरसेविका मनिषा धात्रक, प्रेमा म्हात्रे, कल्याण तालुका ग्रमीण प्रमुख प्रकाश म्हात्रे, भोईर जिमखान्याचे मुकुंद भोईर, मॅरेथॉन पट्टु सुरेश ठाकूर, शाळेच्या मुख्याध्यापिका मिताली इनामदार व मुख्याध्यापक मारुती शिंदे आदि मान्यवर या प्रसंगी उपस्थित होते.