डोंबिवली : सुखात साथ आणि दुःखात हात देणारी माणसे` असा सिद्धिविनायक ग्रुप गेली १० वर्ष गरिबांना मदतीचा हात देत असतात. यावर्षी कल्याणमधील श्री मलंगगड येथील गरीब गरजू, आंधळे, कुष्ठ रोगी, आदिवासी, कातकरी लोकांना नवीन, जुने कपडे, चादर, शोल, बेडशीट, ब्लेकेट, साड्या, ड्रेस, शाळेचे गणवेश, शालेय उपयोगी वस्तू, लहान मुलांची खेळणी, बिस्किटे व इतर वस्तू वाटप करण्यात आले. सिद्धिविनायक ग्रुपचे कैलास सणस आणि सर्व पदाधिकारी आणि सदस्यांचा गरिबांना मदत करण्यासाठी पुढाकार असतो. याबाबत सणस म्हणाले, समाजात गरिबांना मदत हवी असते. याच विचार करून सिद्धिविनायक ग्रुप १० वर्ष काम करत आहे. कल्याणमधील श्री मलंगगड येथील गरीब गरजूंना मदत केली असली तरी आजही अनेक ठिकाणी मदतीची गरज आहे.