डोंबिवली : कोरोना महामारीमूळे सर्व क्षेत्र प्रभावित झाले आहेत. अर्थव्यवस्थेसह शैक्षणिक क्षेत्राचेही अतोनात नुकसान होत असून याचा फटका विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासावर याचा परिणाम होत आहे. मात्र येत्या काळात शाळा सुरू करताना विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेला प्राधान्य द्यावे लागेल असे मत यूरो स्कूल इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल देशपांडे यानी व्यक्त केले. यूरो स्कूलची नवीन 12 वी शाखा डोंबिवली येथील रुणवाल गार्डन परिसरात येथे सुरू करण्यात येणार असल्याची माहिती देताना ते बोलत होते.
कोविड 19 या संसर्गजन्य जागतिक महामारी गेल्या 8 महीने शाळा बंद आहेत. अनेक शाळा महाविद्यालये ऑनलाईन शिक्षणावर भर देत असले तरी व्यक्तिमत्व विकास साधायचा झाल्यास विद्यार्थी आणि शिक्षक यांच्यात सरळ संवाद होने गरजेचे आहे अशी भावना आता विद्यार्थी आणि पालकांची होऊ लागली आहे. याच पार्श्वभूमिवर कोरोना संसर्गला अटकाव करण्यासाठी विविध व आधुनिक साधन सामग्रीचा वापर करण्याकडे अनेक शाळांना कल असल्याचे दिसून येत आहे असेही देशपांडे म्हणाले. त्यांनी पुढे सांगितले, यूरो स्कूल शाळेमध्ये विद्यार्थी सुरक्षित शिक्षण घेऊ शकेल अशी व्यवस्था करण्यात आली विद्यार्थ्यांना संसर्ग होणार नाही याची खबरदारी घेतली जाणार असून साथीची रोग येणारी परिस्थिती लक्षात घेऊन संपूर्ण शाळांमध्ये सुरक्षेच्या दृष्टीने पुरेशा उपाययोजना केल्या जातील.