डोंबिवली : कोपर रस्त्यावरून पायी चालत पूल ओलांडताना एका वृद्ध इसमास बसने धडक दिल्याने ते जखमी झाले. हि घटना मंगळवारी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास डोंबिवली पूर्व – पश्चिमेला जोडणाऱ्या कोपर पुलावर घडली. जखमी वृद्धास तत्काळ जवळील पालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णलयात उपचारासाठी दाखल केले आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, अनिल शिवशंकर जोशी (५४) असे जखमी वृद्धाचे नाव आहे. कोपर रोड मधील हे रहिवाशी असून सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास पायी चालत कोपर पुलावरून जात होते. त्यावेळी शास्त्रीनगर रुग्णलयालगत असलेल्या बस थांबा येथून नवी मुंबईला जाणारी बस या पुलावरून डोंबिवली पूर्वेकडील दिशेने जात होती. दरम्यान जोशी यांना त्या बसने धडक दिल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. या घटननंतर तत्काळ वृद्धाला शास्त्रीनगर रुग्णालयात दाखल केले
