डोंबिवली : पश्चिम विभागातील गोपी टॉकीज चौकात ओम नवतरुण मित्र मंडळ माध्यमातून माघी गणेशोत्सव साजरा करण्यात येत आहे. मंडळाचे अध्यक्ष सुजित नलावडे यांच्या नेतृत्वाखाली हा गणेशोत्सव मोठ्या धूमधडाक्यात साजरा होत असून हजारोंच्या संख्येने गणेशभक्त बाप्पाचे दर्शन आणि महाप्रसादाचा लाभ घेत आहेत. ओम नवतरुण मित्र मंडळाचा माघी गणेशोत्सव १७ व्या वर्षात पदार्पण करीत आहे. गणेशोत्सवाच्या निमित्ताने सामाजिक कार्यक्रम होत असतात. गणेशोत्सवाचे वैशिष्ट्य म्हणजे येथे होणाऱ्या बाप्पाच्या महाआरतीसाठी इतर शहरातील गणेशभक्त आतुरतेने येत असतात. नवतरुण मित्र मंडळ माध्यमातून वर्षभर होणाऱ्या सामाजिक उपक्रमातून आरोग्य शिबीर, शैक्षणिक उपक्रम, आदिवासी विद्यार्थ्यांसाठी मदत, गोरगरीब लहान मुलांचे वाढदिवस आदी कार्यासाठी स्वतः सुजित नलावडे व त्यांचे कार्यकर्ते सामाजिक बांधिलकी जपत असतात.

