डोंबिवली : पूर्वेकडील श्री स्वामी समर्थ मठ, नांदीवली येथे स्वामींच्या मठात गुरुपौर्णिमेनिमित्त भक्तांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. पहाटेपासून मठात गर्दी झाली मंगळवारी दुपारपासून ग्रहण असल्याने संध्याकाळी 4 वाजण्याच्या आत दर्शन घेण्यासाठी भक्तांनी रांगा लावल्या होत्या. मंडळाच्या संस्थापिका सुषमा लिमये, अध्यक्ष नित्यानंद घाटे, अध्यक्षा माधुरी घाटे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उत्सव मोठ्या भक्तिभावाने संपन्न झाला. संस्थापक कै. भालचंद्र (अण्णा) लिमये यांनी या मंडळाची स्थापना केली असून स्वामी समर्थ जयंती उत्सव, गुरुपौर्णिमा, राम नवमी, हनुमान जयंती, दीपोत्सव, गुढीपाडवा आदी उत्सव उपक्रम हिंदू परंपरेनुसारच करण्यात येतात.
शहरातील इंटर अॅॅक्ट क्लब वतीने गुरुपोर्णिमेनिमित्त क्लबचा पदग्रहण समारंभ संपन्न झाला. यावेळी प्रमुख पाहुणे जेष्ठ पत्रकार संदीप प्रधान यांचा हस्ते 10वी – 12वी उतीर्ण विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. तर जीवन मिशन डोंबिवली समिती तर्फे उपासना यज्ञ, गुरुपूजन, दर्शन आणि सांस्कृतिक कार्यक्रम झाला. यावेळी उपस्थित भक्तांना डी,व्ही.डी. माध्यमाद्वारे सद्गुरू वामनराव पै यांचे मार्गदर्शन मिळाले.
डोंबिवली शिवसेना मध्यवर्ती कार्यालयात भगवा पंधरवडा निमित्त जेष्ठ शिवसैनिकांना केडीएमसीचे स्थायी समिती सभापती तथा शिवसेना युवा अधिकारी दिपेश म्हात्रे यांच्या हस्ते शाल, श्रीफळ आणि पावसाळी छत्री देऊन त्यांच्या गौरव करण्यात आला. यावेळी शहरप्रमुख राजेश मोरे, पदाधिकारी किशोर मानकामे, संजय पावशे, मंगला सुळे. कविता गावंड यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते.
पश्चिमकडील स्वामी विवेकानंद शाळेत गुरुपौर्णिमेनिमित्त शाळेतील साहित्य व विज्ञान मंडळातर्फे पंधरा विद्यार्थ्यांची नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. यावेळी बाल साहित्य कवी रमेश तांबे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी साजरा करण्यात आलेल्या गुरुपौर्णिमा उत्सवात गुरूवंदन गीत आणि गुरू-शिष्य परंपरा जोपासण्यासाठी मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक रायसिंग भोजराज यांनी विद्यार्थ्यांना गुरू-शिष्य विषयावर माहिती दिली.
सद्गुरू श्री श्री रवीशंकर यांच्या आर्ट ऑफ लिविंग डोंबिवली तर्फे गुरुपौर्णिमेनिमित्त पूर्वेकडील ब्राह्मण सभा येथे सतसंग आणि गुरुपूजन कार्यक्रम संपन्न झाला. यामध्ये आर्ट ऑफ लिविंगचे प्रशिक्षक आणि स्वयंसेवकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता अशी माहिती आर्ट ऑफ लिविंगच्या रोहिणी लोकरे यांनी दिली.
इन्हर व्हील क्लब तर्फे यावर्षी गुरूपौर्णिमा उत्सव नव्या पद्धतीने साजरा करण्यात आला. अन्न हे पूर्णब्रह्म या विषयावर प्रमुख पाहुण्या तथा पोषण आहारतज्ञ अर्चना नाईक नाईक यांनी आहाराची पौष्टिक मूल्य या विषयावर माहिती दिली. कानविंदे हॉल, क्रीडा भवन, पेंडसेनगर, डोंबिवली पूर्व येथील या कार्यक्रमात सदस्यांची उपस्थिती भरगच्च होती. यावेळी पिटंबरीच्या नवीन उत्पादनांचे सादरीकरण करण्यात आले