डोंबिवली : शिवसेने तर्फे भगवा पंधरवडा अभिनयाचे औचित्य साधून माजी स्थायी समिती सभपती तथा जेष्ठ नगरसेवक रमेश सुकऱ्या म्हात्रे यांनी गुणवत विद्यार्थ्यांचा गुणगौरव आणि लोकसभा निवडणुकीत खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचा विक्रमी विजय या निमित्त त्यांची शैक्षणिक साहित्यांनी तुला असा भव्य सोहळा आयोजित केला होता. या सोहळ्यात हास्य प्रबोधनकार संजीवन म्हात्रे यांचा ‘याल तर हसाल’ या हसण्याच्या उत्सवाचा डोंबिवलीकरांनी मनोसोक्त आनंद घेतला.
पूर्वेकडील कोपररोड येथील भव्य मैदानावर पार पडलेल्या गुणगौरव सोहळ्याच्या व्यासपीठावर खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, शिवसेना शहरप्रमुख राजेश मोरे, नगरसेवक रमेश म्हात्रे, नगरसेविका गुलाब म्हात्रे, माजी नगरसेवक संजय पावशे, उपशहर प्रमुख किशोर मानकामे, मनोज म्हात्रे, महिला आघाडी संघटक मंगला सुळे, किरण मोंडकर आदी मान्यवर उपस्थित होते.
खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांची यांची शैक्षणिक साहित्याने तुला करतांनाच ‘शिवसेना झिंदाबाद’च्या घोषणानी परिसर दणाणून गेला. यावेळी डॉ. शिंदे म्हणाले, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे साहेबांची 80 टक्के समाजकारण आणि 20 टक्के राजकारण ही शिकवण प्रत्येक सैनिकाच्या हृदयात कोरलेली आहे. आणि त्यामुळेच विक्रमी मताधिक्याने विजयी झालो. शिवसेना समाजपयोगी कार्य सतत करीत असते. प्रत्येकाच्या सुखदु:खात आणि कोणत्याही आपतीत धावून जाणारे सैनिकच असतात. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना त्यांनी सांगितले कि, विद्यार्थ्यांच कौतुक करावे तेवढे थोडेच आहे पण त्यांनी पुढील वाटचाल मनातील आवडीनुसार करा कारण जग स्पर्धात्मक
तर यावेळी रमेश म्हात्रे म्हणाले, आमच्या विभागात 90 टक्क्या पासून 98 टक्क्यांपर्यंत गुण मिळविलेले हिरे आहेत. हे हिरे सर्वांसमोर यावेत, ही गौरवबाब सर्वांना माहित व्हावी म्हणून हा गुणगौरव सोहळा होत आहे. हीच मुले देशाची भवितव्य आहेत आणि हीच डोंबिवलीची शान आहे. नागरिकांच्या मागणीनुसार खासदार डॉ. श्रीकांत शिंदे शहरातील विकास कामे करीत आहेत. कोपर मधील मतदार हे शिवसेनेचे फिक्स डिपॉझीट आहे.
सदर शोहाल यशस्वी करण्यासाठी किशोर मानकामे, शेखर खेडेकर, किरण यांच्यासह सर्वच पदाधिकाऱ्यांनी विशेष मेहनत घेतली.