डोंबिवली : श्रीगणेश उत्सव दरम्यान दिल्ली येथे श्री कला संस्कार डोंबिवली संस्थेतर्फे सातत्याने 20 वर्षे दिल्ली येथील विविध महाराष्ट्र मंडळात लोककलेचा नृत्याविष्कार सादरीकरण करण्यासाठी आमंत्रित केले जाते. या वर्षीही विठ्ठल मंदिर, आर के पुरम, दिल्ली येथील महाराष्ट्र सदन येथे कार्यक्रमाचे सादरीकरण झाले. संस्थेच्या दिपाली काळे, शिल्पा कुलकर्णी, ज्युली आठले,संतोष म्हापुसकर यांच्या नेतृत्वाखाली दहा कलाकारांनी आपली कला सादर केली.
सातत्याने 20 वर्षाहून अधिक श्री कला संस्कार दिल्ली येथे सार्वजनीक उत्सव समिती आयोजित विविध महाराष्ट्र मंडळात लोककला आणि हिंदी मराठी गीतावर आधारित नृत्याविष्कार सादर करण्यासाठी दिल्ली येथे जात आहे. आर के पुरम दिल्ली येथील महाराष्ट्र सदनात या कार्यक्रमाला उदंड प्रतिसाद मिळाला. कलाकारांनी नृत्याविष्कार सादर केले. शिल्पा कुलकर्णी,संतोष म्हापुसकर, ज्युली आठले यांनी संपूर्ण कार्यक्रमाचे दिग्दर्शन केले.

दिपाली काळे यांच्या नेतृत्वाखाली सर्व कलाकार नुकतेच परत आली. एकूण बारा कलाकार यामध्ये सहभागी झाले होते. ठाणे जिल्ह्यातून सातत्याने जाणारी श्री कला संस्कार ही एकमेव संस्था आहे.