( माजी नगरसेवक मंदार श्रीकांत हळबे यांचे आवाहन )
कल्याण डोंबिवली महानगरपालिका प्रभाग क्र. ६८ राजाजीपथ-रामनगर येथील भारतीय जनता पार्टीचे माजी नगरसेवक तथा विरोधी पक्ष नेता मंदार हळबे यांनी तमाम डोंबिवलीकरांना आवाहन केले आहे की, रक्षाबंधन या सणाच्या निमित्ताने भारत मातेचे अहोरात्र संरक्षण करणाऱ्या भारतीय सैन्यदलातील आपल्या शूरवीर जवानांसाठी एक राखी पाठवा आम्ही आपल्या जवानांपर्यंत ती प्रेमाची राखी पोहचविण्याचे कार्य करू. या कार्याला आपली साथ द्या असे आवाहन हळबे यांनी केले आहे.
आपल्या मनात आपल्या जवानांप्रती असलेले प्रेम लक्षात घेतले तरी सीमेवर तैनात असलेल्या आपल्या या बंधुरायाला प्रत्यक्ष जाऊन त्याच्या हातावर राखी बांधने आपल्याला सहज शक्य होत नाही. परंतू आपली ही राखी त्यांच्यापर्यंत पोहोचवून त्यांच्या हातावर ती बांधली जावी ही तुमच्या मनातील इच्छा पूर्ण करता येणार आहे. कारण येत्या 15 ऑगस्ट रोजी स्वातंत्र्यदिनी विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. गुजरात येथील भूजच्या सीमेवर भारतीय जवानांसाठी एक कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमात या नृत्यसंस्थेचे विद्यार्थी खास देशभक्तीपर आणि माजी नगरसेवक मंदार हळबे यांच्यासह एकलव्य आर्ट फोरम कथ्थक नृत्य कला संस्था आणि श्री मुद्रा कलानिकेतन रक्षाबंधनावर आधारीत नृत्याच सादरीकरण करणार आहेत. मनोरंजना सोबतच तेथील जवानांना गस्त घालण्यासाठी 10 ई रिक्षा प्रदान सोहळा देखील यावेळी पार पडणार आहे.
यावेळी भारतीय जवानांसोबत रक्षाबंधनाचा कार्यक्रम देखील होणार असून त्यावेळी आपल्याकडून पाठविलेली राखी जवानांच्या हातावर बांधली जाणार आहे. यासाठी तुम्ही एक राखी एका छानशा पाकिटात पॅक करुन 1, रामभुवन रेसिडेन्सी, स्वामी नारायण मंदिर समोर, राजाजी पथ, डोंबिवली (पू.) सकाळी 10 ते 1 आणि सायंकाळी 6 ते 8.30 यावेळेस पाठवावी असे आवाहन मंदार हळबे यांनी केले आहे. राखी पाकिटावर तुमचे पूर्ण नाव, पत्ता व फोन नंबर जरूर लिहा. ती राखी भूजवरील जवानांपर्यंत नक्की पोहोचवणार आहे. येत्या 12 ऑगस्ट पर्यंत ही ही राखी पाठवू शकता. अधिक माहितीसाठी 9833251426 या मोबाईल नंबरवर संपर्क साधावा असेही हळबे यांनी कळविले आहे.