वाढदिवसानिमित्त फळेवाटप : रुग्णालयातील रुग्णांनी दिले उध्दव यांना उदंड आयुष्याचे आशिर्वाद

डोंबिवली, दि. २७ (प्रतिनिधी)  : शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त डोंबिवली व  कल्याणच्या विविध रुग्णालयात परिवहन सभापती संजय पावशे यांच्या हस्ते रुग्णांना फळांचे वाटप करण्यात आले. त्यावेळी रुग्णांनी उध्दव यांना उदंड आयुष्य लाभो असे आशिर्वाद सभापती संजय पावशे यांच्याकडे व्यक्त केले.

या फळवाटपांचे आयोजन दरवर्षीप्रमाणे परिवहन समिती सदस्य मधुकर यशवंतराव यांनी केले होते. फळवाटप कार्यक्रमात वालधुनीचे नगरसेवक पुरुषोत्तम चव्हाण, परिवहन समिती सदस्य राजेंद्र दिक्षित, मनोज चौधरी उपस्थित होते. वालधुनी येथील मंडल रेल अस्पताल व पालिकेच्य रुक्मीणीबाई रुग्णालयात आज सकाळी फळांचे वाटप करण्यात आले.

वालधुनी येथील मंडल रेल अस्पताल येथे पुरुष वाड। महिला वार्ड, प्रसुतीगृह, अतिदक्षता विभाग, शल्यचिकित्सा विभाग इत्यादी विभागातील रुग्णांना सभापती पावशे, सदस्य यशवंतराव  इतर समिती सदस्य यांनी फळांचे वाटप केले. या फळेवाटप प्रसंगी मंडल रेल अस्पतालच्या मुख्य चिकित्सा अधिकारी डॉ. सुषमा रोज तिरकी, सहाय्यक नर्सिग अधिकारी प्रतिभा फेगडे, डॉ. विल्लेश मिश्रा, डॉ. शशांक मेरात, डॉ. एच. बी. शेट्टी इत्यादी वैेद्यकिय अधिकारी व कर्मचारी वंृद उपस्थित होते. कर्मचाऱ्यांना देखील भेट म्हणून गुलाबपुष्प देण्यात आले.

कल्याण येथील महापालिकेच्या रुक्मीणीबाई रुग्णालयात उध्दव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त रुग्णांना फळे वाटप करण्यात आली. कल्याण येथील सेना पदाधिकारी अशोक चाळके, नंदू पावशे, समीर काळे, दयाराम जाधव, बुवा दळवी, रमेश काकडे, गणेश चिखले, डोंबिवली कोपर येथील उपशाखाप्रमुख किसन म्हात्रे, शाखा कार्यकारीणी प्रमुख देसाई मामा, कार्यालय प्रमुख तानाजी बुद्रुक, स्वप्नील तेंडूलकर यांनी फळे वाटप कार्यउा्रऎम आयोजनात मोलाचे सहकार्य केले.

दरम्यान आज सकाळी उध्दव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त डोंबिवलीतील बस प्रवाशांना सभापती संजय पावशे यांनी भेट म्हणून गुलाबपुष्प दिले.