डोंबिवली, दि. २७ (प्रतिनिधी) : सुप्रसिद्ध सतार वादक तसेच स्वरतीर्थं सुधीर फड़के स्मृति समितीचे विश्वस्त पंडित रसिक हजारे यांचे गेल्या महिन्यात निधन झाले. त्याचप्रमाणे चतुरंगचे प्रमुख कार्यकर्ते, डोंबिवलीच्या सांस्कृतिक क्षेत्रातील एक व्यक्तिमत्व आणि नागरी सत्कार समितीचे विश्वस्त किरण जोगळेकर यांचे निधन झाले. या दोन्ही व्यक्तिमत्वानां आदरांजली वाहण्यासाठी एका सांगितिक मैफलचे आयोजन करण्यात आले आहे.
सदर कार्यक्रम स्वरतीर्थं सुधीर फड़के स्मृति समिती आणि नागरी सत्कार समितिच्या माध्यमातून होणार आहे. रविवार, दि. ३० जुलै २०१७ रोजी सकाळी ९.४५ वाजता महापालिकेच्या सावित्रीबाई फुले नाट्य मंदिरात मैफिलीचा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमात स्वरतिर्थची शिष्यवृत्ती मिळालेल्या आणि रसिक हजारे यांच्या शिष्या अमृता लोखंडे-मोरे आणि रसिक हजारे यांचे शिष्य एकत्रित पूर्वार्धात सतार वादन करणार आहेत. तर उत्तरार्धात आंतरराष्ट्रीय किर्तीचे सतार वादक रवि चारी हे सतार वादन करणार असून त्यांना तबल्यावर साथसंगत तनय रेगे करणार आहे. यावेळी स्वरतीर्थं तर्फे संगित क्षेत्रात करीयर करणाऱ्या कलाकारांना दिल्या जाणाऱ्या वार्षिक शिष्यवृत्तीचे वितरणही होणार आहे. सदर कार्यक्रमास डोंबिबलीकरांनी अवश्य उपस्थित राहावे अशी विनंती आयोजकांनी केली आहे.