डोंबिवली, दि. ०२ (प्रतिनिधी) : पूर्वेकडील ग्रामीण विभागातील सागाव येथील इंडो अमाईन्स कंपनीच्या आवारातील ऑक्सी क्लोराईड या केमिकलने भरलेल्या ड्रमचा पाण्याशी संयोग झाल्याने दुपारी सव्वा बाराचे सुमारास स्फेाट झाल्याची चर्चा असून यामध्ये दोन कामगार जखमी झाल्याचे परिसरातील नागरिकांनी सागीतले. मात्र कंपनीने या संदर्भात स्पष्ट इन्कार केला असून आवारात असलेल्या रिकाम्या ड्रममध्ये हवा जास्त भरली व त्यामुले स्फोट झाल्याचे कामगार सांगतात व यामध्ये कोणीही जखमी झाल्याचा इन्कार करीत आहेत.
डोंबिवली औद्योगिक विभाग दोन मधील कंपनीत दिवसपाळीमध्ये १५ कामकार कामावर होते. यातील दोन कामगारांनी ऑक्सी क्लोराईडचा रिकामा ड्रम उघडण्याचा प्रयत्न केला असता पावसाच्या पाण्याशी संपर्क आला असल्याने त्यातील फॉस्परसचा स्फोट झाला. या आवाजामुळे कंपनीतील कामगार भितीने बाहेर पळाले. ही घटना घडताच कपंनीचे अधिकारी योगेश सोनी यानी फायर ब्रिगेडला बोलावले. अग्निशामन दलाचे अधिकारी सुरेश शिंदे व पथकाने तात्काळ भेट देऊन चौकशी केली. या दुघटनेत कोणतीही जिवित वा वित्तहानी नसल्याचे युनिट प्रमुख प्रशांत पाटील यांनी सांगीतले. मात्र कंपनीनीतील अधिकारी काहीच घटना झाली नसल्याचे सांगत आहेत. तसेच मानपाडा पेालीस ठाण्यात मात्र कोणतीही नोंद झालेली नाही.