जय प्रल्हाद जाधव यांची रिपाईचे युवा नेता म्हणून निवड

डोंबिवली, दि. ११ (प्रतिनिधी) : कल्याण डोंबिवली शहरातील रिपब्लिकन पार्टी आँफ इंडीयाच्या (आठवले गट) च्या युवक आघाडीच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या वतीने जय प्रल्हाद जाधव यांची युवा नेता म्हणून निवड केली आहे. त्यांच्या निवडीमुळे युवकांमध्ये आंनदाचे व जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले. काल कल्याण येथे रिपाई युवक आघाडीची बैठक झाली त्यात जय जाधव यांच्या निवडीचा ठराव एक मताने मंजूर करण्यात आला. सदर बैठकीच्या अध्यक्षस्थानी कल्याण डोंबिवली जिल्हा अध्यक्ष प्रल्हाद जाधव होते. निवडीनंतर शेकडो युवकांनी त्यांचे अभिनंदन केले.

कल्याण शहर युवक आघाडी, डोंबिवली शहर युवक आघाडी, मोहना शहर युवक आघाडी, टिटवाळा शहर युवक आघाडीचे युवा पदाधिकारी उपस्थित होते. त्याचप्रमाणे डोंबिवली शहर अध्यक्ष अंकुश गायकवाड, कल्याण शहर अध्यक्ष रामा कांबळे, मोहना शहर अध्यक्ष व माजी नगरसेवक महेंद्र गायकवाड, टिटवाळा शहर अध्यक्ष विजय भोईर, मोहना शहर युवा अध्यक्ष दिनेश जाधव उपस्थित होते. या बैठकीत कल्याण डोंबिवली शहर जिल्हा सचिव पदी रमेश बर्वे यांची निवड करण्यात आली अशी माहिती डोंबिवली शहर अध्यक्ष अंकुश गायकवाड यांनी दिली.