डोंबिवली : चिरंजीवी संस्था आणि इंडियन मेडिकल असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने अवयवदान जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सदर कार्यक्रम सर्वेश सभागृह, टिळक रोड, डोंबिवली पूर्व येथे रविवार दि. 26 नोव्हेंबर रोजी सायंकाळी ६ ते ७.३० वेळेत होणार आहे. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. संगीता दांडेकर, डॉ. लीना लोकरस, डॉ. शीतल किस्मतराव, डॉ. निती उपासनी आदी मान्यवर डॉक्टर उपस्थित राहणार आहेत. डोंबिवलीकरांनी या कार्यक्रमास उपस्थित रहावे अशी विनंती संस्थेच्या अध्यक्षा श्रद्धा भिडे यांनी केली आहे. अधिक माहितीसाठी 8691877444 या क्रमांकावर संकर्प साधावा.