डोंबिवली : दाटून आलेले नभ त्यानंतर कोसळणारा पाउस, अशा भावनेने ओथंबलेल्या अश्रु आणि उत्साहाच्या वातावरणात शिवाजीदादा स्मृती चषक क्रिकेट वितरण सोहळा संपन्न झाला. माजी जेष्ठ नगरसेवक कै. शिवाजी शेलार यांच्या स्मरणार्थ साई श्रध्दा क्रिकेट संघाच्या वतीने मर्यादित षटकांचे सामने ह.भ.प. सावळाराम महाराज क्रिडा संकुलात आयोजित करण्यात आला होत. कै. शिवाजी शेलार यांच्याबद्दल खेळाडू व मान्यवरांच्या व्याकूळ आठवणीने अनेकांच्या डोळ्यांच्या कडा ओलावल्या. नगरसेवक साई शेलार यांनी या सामन्याचे आयोजन केले होते.
देसई गावच्या जय वाघेश्र्वरी क्रिकेट संघावर मात करीत चिकणघरचा जय म्हसोबा क्रिकेट संघ रोमहर्षक अंतिम सामन्यात विजयी ठरला. नगरसेवक महेश पाटील यांच्या हस्ते विजेते संघास दोन लाख रोख पारितोषिक व शिवाजीदादा शेलार स्मृती चषक देण्यात आला. तर उपविजेते संघास एक लाख व स्मृती चषक देण्यात आला.
या वेळी साई शेलार, काँग्रेसचे ब्लॉक अध्यक्ष गंगाराम शेलार, माजी नगरसेविका शिल्पा शेलार, शशिकांत कांबळे, सिध्दार्थ शेलार, तुळशीराम जोशी, राजू शेख उपस्थित होते.
सामन्यातील इतर पारितोषिके : तुत्तीय संघ – जय हनुमान क्रिकेट संघ, डायघर, रोख पन्नास हजार व स्मृती चषक. चतुर्थ संघ : निशांत इलेवन क्रिकेट संघ, वाकळन, रोख पन्नास हजार व स्मृती चषक. उत्कृष्ट क्षेत्ररक्षक- ऋषी भोईर, निशांत, वाकळन उत्कृष्ट गोलंदाज – उमेश म्हात्रे, जय वाघेश्वरी, देसई उत्कृष्ट फलंदाज – प्रशांत भोईर, चिकणघर सामनावीर – प्रशांत भोईर, चिकणघर. मालिकावीर – शंतून पाटील मैदानाचा राजा – ज्यु.नितीन – बाइक पटकावली.