डोंबिवली : शहरातील खवय्यांसाठी खास बिर्याणी फेस्टिवलचे आयोजन स्वराज्य इव्हेंट्स आणि आविष्कार ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आहे आहे. बिर्याणी फेस्टिवल पूर्वेकडील स. वा. जोशी विद्यालय पटांगणात होणार असून विविध प्रकारच्या बिर्याणीची चव डोंबिवलीकरांना घेता येणार आहे.
येत्या शुक्रवारी ते रविवार १३, १४ आणि १५ एप्रिल रोजी संध्याकाळी ५ ते १० या वेळेत स. वा. जोशी विद्यालय पटांगण, छेडा रोड, सारस्वत कॉलनी, डोंबिवली पूर्व येथे तीन दिवस हा फेस्टीवल सुरू राहणार आहे. यामध्ये हैद्राबादी बिर्याणी, दम बिर्याणी, बांबू आणि मटका बिर्याणी, मलाई सिख बिर्याणी, इटालियन बिर्याणी, आगरी बिर्याणी, सुरमई बिर्याणी, अवधी बिर्याणी, मटण बिर्याणी, झमझम बिर्याणी, मेयोनीज बिर्याणी, शाही बिर्याणी आणि मुख्य म्हणजे शाकाहारींसाठी काश्मिरी पुलाव, मोड आलेल्या धान्यांचा वापर करून केलेली पौष्टीक बिर्याणी, पनीर लव्हरसाठी पनीर टिक्का बिर्याणी आणि अख्खा मसूर बिर्याणी, मश्ररूम बिर्याणी असे असंख्य बिर्याणीचे प्रकार या फेस्टीवलमध्ये उपलब्ध आहेत.
बिर्याणी जागेवरच खाण्याची तसेच पार्सलची देखील सुविधा येथे असणार आहे. अशी माहिती आय़ोजक स्वराज्य इव्हेंट्सचे समर्थ व अविष्कार ग्रुपचे समीर चिटणीस यानी डोंबिवलीत एका पत्रकार परिषदेत दिली. परंतु या बिर्याणीची चव घेण्याअगोदर प्रवेश फी भरावी लागणार आहे. बिर्याणीचा आस्वाद घेताना हिंदी-मराठी गाण्याचा दर्जेदार कार्यक्रम पहाता येणार आहे. आयोजकांनी या माध्यमातून कलाकारांना एक व्यासपीठ उपलब्ध करून दिले असल्याने प्रख्यात स्थानिक कलाकारांना संधी प्राप्त होणार आहे.