डोंबिवली : नियम मोडून बांधलेल्या इमारती या महापालिकेच्या दुष्टीने अनधिकृत आहेत. त्यामुळे त्यांना कायदेशीरपणे वीज, पाणी या मूलभूत सुविधा मिळत नाहीत. २७ गावात देखील हिच परिस्थिती आहे. मात्र लौकिक होम्स, शेतकरी आणि जमीन मालक यांच्याकडून संयुक्तपणे हा गुहप्रकल्प साकारण्यात येत आहे. २७ गावांच्या नियोजनबद्ध विकासासाठी लौकिक होम्स प्रकल्प आदर्श माँडेल ठरेल असा विश्वास खा. डॉ. श्रीकांत शिंदे यांनी आज व्यक्त केला.
या प्रकल्पाचा शुभारंभ भूमीपूजन खा. शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. चेरानगर, सागाव येथे हा प्रकल्प आकार घेणार आहे. यावेळी आ. सुभाष भोईर, माजी आमदार रमेश पाटील, पालिका सभागृह नेते राजेश मोरे, काँग्रेसचे संतोष केणे, प्रकल्प समन्वयक प्रकाश म्हात्रे, नगरसेविका प्रेमा म्हात्रे, दिपाली पाटील, वाय शंकर, पोपट भंडारी आदी उपस्थित होते.
सदर प्रकल्पाचे भूमिपूजन केल्यानंतर खा. शिंदे म्हणाले, बांधकाम व्यावसायिक शेतकरी व जमिन मालक एकत्र येऊन हा प्रकल्प राबवित आहेत ही अभिमानाची बाब आहे. प्रकल्प दहा वर्ष रखडला हे चांगले झाले. चांगले असते ते भक्कम टिकाऊ असते. २७ गावात गरीबांना परवडणारी घरे हवीत. आपले घरांसाठीचे शासकीय धोरण भक्कम हवे.
सुभाष भोईर म्हणाले कि, येथे मोठे संकुल होईल. चांगल्या वातावरणात चांगलं जगण्याचा आनंद मिळेल. तर रमेश पाटील यांनी प्रकल्पाला शुभेच्छा दिल्या. आभार प्रदर्शन करतांना प्रकाश म्हात्रे यांनी सांगितले कि, या प्रकल्पासाठी पालिका, महसूल, पर्यावरण विभाग आदी सर्व परवाने घेतले आहेत. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन विवेक पोरजी यांनी केले.