घरगुती गॅससाठी पाईपलाईन टाकण्यास स्थानिक नागरिकांचा ठाम विरोध

डोंबिवली : डोंबिवलीत घराघरातून गॅसपुरवठा करण्यासाठी महानगर गॅस कंपनीकडून २००५ पासून काम सुरु आहे. निवासी भागात आतापर्यत सुमारे १२०० नागरिकांना घरगुती गॅस पुरवठा सुरू करण्यात आला आहे. सध्या डोंबिवली जिमखाना रोड, सांगर्ली आदजे भागात यासाठी रस्ते खोदण्याचे काम सुरु आहे. या कामाला स्थानिक नागरिकानी ठाम विरोध केला आहे. आधिच औद्योगिक भागातील रस्ते अत्यंत खराब असून गॅस कंपनी काम संपल्यावर रस्ता नीट करत नाही. म्हणूनच नागरिकांचा विरोध होत आहे. परिणामी गॅसपुरवठा करणे अवघड होणार आहे.

नागरिकांनी दिलेल्या महितीनुसार सध्या सागर्ली येथे दोन ठिकाणी रस्ता क्रॉसिंग करुन पाईपलाईन खोदण्याचे काम सुरु केले. या कामाला नागरिकांनी विरोध केल्यामुळे हे काम रखडले आहे. महानगर कंपनी काम संपल्यावर रस्त्यावर केवळ माती टाकून रस्ता करत असून नंतर तो रस्ता खचतो. अशा प्रकारच्या कामामुळे वाहनांचे अपघात होऊन नागरिक जमखी झाल्याच्या घटना घडल्या आहेत. यामुळे नागरिकानी याला विरोध केला आहे. महानगर कंपनी याची जबाबदारी घेणार का असा प्रश्न विचारला जात आहे.

याबाबत महानगर गॅस कंपनीकडे विचारणा केली असता असे समजते कि, रस्ता पुर्ववत करण्यासाठी डोंबिवली औद्योगिक विभागाला रस्ता दुरुस्त करण्यासाठी सुमारे २ कोटी २४ लाख रुपये दिले आहेत. त्यमुळे रस्ते पूर्ववत करण्याची जबाबदारी औद्योगिक विकास महामंडळाचीच आहे. तर डोंबिवली औद्योगिक विभागाचे अधिक्षक अभियंता रमाकांत पंडितराव यांनी सांगितले कि, अधिकाऱ्यांना तातडीने खोदलेले रस्ते योग्य प्रकारे दुरुस्त करण्याचे निर्देश दिले. यामुळे मग नागरिकांनी आपला विरोध मागे घेतला. आता पुन्हा हे काम सुरु करण्यात येणार आहे. आतापर्यत कंपनीने मिलापनगर, सुदर्शन नगर, सुदामानगर व दोन कंपन्यांना अशा १२०० घरगुती ग्रहकाना गॅस पुरवठा करण्यात आला असून सध्या डोंबिवली जिमखाना रोड, सागर्ली, आजदे येथे पाईपालाइन टाकण्याचे काम हाती धेण्यात येणार असून सहा महिन्यात हे काम पूर्ण होईल असे सांगण्यात आले.