डोंबिवलीत संपूर्ण गीतरामायण कार्यक्रमाचे आयोजन

डोंबिवली : स्वर संस्कार निर्मित आधुनिक वाल्मिकी कै. ग.दि. माडगुळकर रचित सुरश्रेष्ठ कै. सुधीर फडके यांनी स्वरबद्ध केलेले आणि गायलेले संपूर्ण गीतरामायण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सदर कार्यक्रम महापालिकेच्या सावित्रीबाई फुले कलामंदिर येथे शुक्रवार, शनिवार आणि रविवार म्हणजेच दि. 27, 28 आणि 29 एप्रिल, 2018 रोजी तीन दिवस रात्रौ 8.30 होणार आहे. गायक घनंजय भोसेकर यांच्या गायकीला नीला सोहनी, प्रमोद सोहनी आणि वैकटेश कुलकर्णी यांनी साथ-संगत मिळणार आहे. सदर कार्यक्रमाचे निवेदन देवयानी भोसेकर करणार आहेत. विशेष म्हणजे हा कार्यक्रम विनामूल्य असून या कार्यक्रमात दधिची देहदान मंडळाचे संस्थापक गुरुदास तांबे यांना सद्गरू चंद्रकांत अनंत भोसेकर सेवाव्रत पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाचे विशेष अतिथी म्हणून जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते विनोद करंदीकर, जेष्ठ शिक्षणतज्ञ दर्शन सामंत आणि जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते प्रवीण दुधे उपस्थित राहणार आहेत.