डोंबिवली : श्री गणेश मंदिर संस्थान डोंबिवलीच्या ९४व्या वर्धापन दिना निमित संस्थांच्या माध्यमातून विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहेत. शुक्रवार दि. 4 मे रोजी सायंकाळी 7.00 वाजता वैद्य परीक्षित शेवडे यांचे व्यक्ति तितक्या प्रवृत्ती या आयुर्वेद विषयावर व्याख्यान होणार आहे. शनिवार दि. 5 मे रोजी सकाळी 7.00 वाजता रामपंचायतन याग आणि महाप्रसाद असा कार्यक्रम आहे. रविवार, दि. 6 मे रोजी सायंकाळी 5 वाजता अकोल्याच्या संगीत विषयात पी.एच.डी. केलेल्या डॉ. गीताली पुंडकर यांचे सुश्राव्य गायन होणार आहे. या सर्व कार्यक्रमास डोंबिवलीकरांनी अगत्याने यावे अशी विनंती विश्वस्त मंडळाने केली आहे.