डोंबिवलीत विशेष व्याख्यानमालेचे आयोजन

डोंबिवली : महाराष्ट्र साहित्य परिषद, डोंबिवली शाखा आणि डोंबिवली ग्रंथ संग्रहालय यांच्या संयुक्त विद्यमाने एका विशेष व्याख्यान मालेचे आयोजन करण्यात आले आहे. सदर व्याख्यानमालेस ज्येष्ठ साहित्यिक वामनराव देशपांडे उपस्थित राहणार आहेत.

शहरातील ग्रामदैवत असणाऱ्या श्री गणेश मंदिर संस्थानच्या सभागृहात सप्टेंबर दि. 28, 29 आणि 30 अशा तीन दिवसांच्या व्याखानमालेत येत्या शुक्रवारी सायंकाळी 6.00 वाजता कवियत्री शांता शेळके, शनिवारी सायंकाळी 6.00 निसर्ग कवी-बालकवी आणि रविवारी सायंकाळी 6.00 शब्दप्रभू ग. दि. माडगुळकर आदी मराठी काव्य स्रुष्टीवर आपल्या अलौकिक प्रतिभेने अमीट ठसा उमटविणारे दिग्गज व्याख्यानमालेत आपली पुष्पे गुंफणार आहेत. या व्याख्यान मालेसाठी ज्येष्ठ साहित्यिक वामनराव देशपांडे यांना आलर्जून उपस्थित राहण्याची विनंती करण्यात आली आहे. सदर तीन दिवस चालणाऱ्या व्याख्यानमालेला अनक्रमे माधव जोशी, आबासाहेब पटवारी व ज्येष्ठ संगीतकार गायक वसंतराव आजगांवकर अध्यक्ष म्हणून उपस्थित राहणार आहेत अशी   माहिती महाराष्ट्र साहित्य परिषद डोंबिवली शाखेचे कार्याध्यक्ष सुरेश देशपांडे यांनी दिली आहे.