स्मशानभूमीतील कर्मचाऱ्यांना आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त आर्थिक सहाय्य व किराणाचे वाटप

डोंबिवली : युवासेना प्रमुख, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त डोंबिवली येथील स्मशानभूमीत गेली दोन वर्ष करोनाचा सामना धैर्याने करणा-या स्त्री पुरुष कर्मचाऱ्यांना युवासेना डोंबिवली शहर वतीने किराणा साहित्य वाटप आणि आर्थिक सहाय्य करण्यात आले. विशेष म्हणजे डोंबिवली येथील शिवमंदिर स्मशानभूमीत हा उपक्रम पार पडला. यावेळी डोंबिवली शिवसेना शहरप्रमुख राजेश मोरे युवा सेना विधानसभा अधिकारी राहुल म्हात्रे, सागर दुबे, जाई ढोले, शितल कारंडे, मयुर म्हात्रे, विपुल म्हात्रे तसेच डोंबिवली युवासेना व युवती पदाधिकारी आणि कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. मंत्री आदित्य ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या नंतर राजेश मोरे म्हणाले कि, गेली दोन वर्ष डोंबिवलीतील विविध स्मशानभूमीत सारे जग करोना मुळे भयभीत झाले असताना, धैर्याने काम करणा-यां स्मशानभूमीतील कर्मचाऱ्यांना युवा सेनेच्या वतीने अन्नधान्य वाटप करण्यात आले.

यावेळी राहुल म्हात्रे म्हणाले कि, कोरोना काळात घरच्या व्यक्तींची किंवा स्वतः च्या जिवाची पर्वा न करता अंत्यसंस्काराचे कर्तव्य पार पाडणा-या कर्मचाऱ्यांना अन्नधान्य वाटप करणे गरजेचे होते.

डोंबिवली शहरातर्फे डोंबिवली पूर्व आणि पश्चिम स्मशानभूमीत काम करणारे ४० ते ५० कर्मचाऱ्यांना किराणासाहित्य वाटप व आर्थिक मदतीसह शहरातील अनाथआश्रम व वृद्धाश्रम येथे फळवाटप असे अनेक समाज उपयोगी विविध प्रकारचे उपक्रम पार पडले.