डोंबिवली : शहराच्या वाढत्या शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक गरजा लक्षात घेऊन येथील स वा जोशी विद्यासंकुलातील जी.इ.आय. ब्लॉसम इंटरनॅशनल स्कूल येथे एका अत्याधुनिक मिनी ऑडिटोरियमची निर्मिती, जनरल एजुकेशन इन्स्टिटयूट, दादर शिक्षणसंस्थेने केली आहे असे जी. इ.आय. चे विद्यमान अध्यक्ष डॉ. उल्हास कोल्हटकर यांनी सांगितले.
यावेळी ते पुढे म्हणाले, प्रख्यात सर्जन आणि माजी केईएम व सायन हॉस्पिटल्सचे डीन डॉ. अविनाश सुपे यांच्या हस्ते ब्लॉसम इंटरनॅशनल स्कूलचे कै. गोपाळ नारायण आक्षीकर सभागृहाचे उद्घाटन ब्लॉसम इंटरनॅशनल स्कूल, नेहरू रोड, डोंबिवली (पू) येथे रविवार दि. 18 सप्टेंबर 2022 रोजी सकाळी 9:00 वाजता होणार आहे. यावेळी सार्वजनिक बांधकाम, अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री रविंद्र चव्हाण, जीईआय कार्यकारी अध्यक्ष शैलेंद्र साळवी, अध्यक्ष डॉ उल्हास कोल्हटकर, सचिव प्रकाश अधातराव उदघाटन समयी उपस्थित राहणार आहेत.
डोंबिवलीत २०१२ रोजी फक्त ३५ विद्यार्थ्यांचा प्रवेश होऊन जी. इ. आय. ब्लॉसम इंटरनॅशनल स्कूल मध्ये
आज १२०० विद्यार्थी शिकत आहेत. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा याकरिता शाळेने अत्याधुनिक तंत्रज्ञानासह१५० आसन व्यवस्थेचे मिनी ऑडिटोरियम, व्यासपीठ क्रिकेट व अन्य मैदानी खेळांकरिता विविध मैदाने तसेच, अत्याधुनिक लायब्ररी, रोबोटिक व आयोटी लॅबोरेटरी आणि जर्मन, फ्रेंच, स्पॅनिश, संस्कृत व मँडारिन भाषांचा अंतर्भाव शिवाय पर्यावरण प्रयोगशाळा व संगीत, नृत्य आदी गोष्टींची व्यवस्था येथे असून संपूर्ण वातानुकूलित असे आहे.
यावेळी संस्थेचे उपकार्याध्यक्ष प्रदीप गोसावी, संचालक मंडळ सदस्य विकास पुराणिक, संजय कानिटकर, गजानन बागुल प्रिन्सिपॉल निलजा पाटील उपस्थित होते.