सर्व-सामान्य माणसाने वैद्यकीय तपासणी करून घ्यावी !

( बाज आर आर हॉस्पिटलचे मुख्य डॉ. अमीर कुरेशी यांचे वक्तव्य )

डोंबिवली : ज्या रुग्णाला आपल्या आजारची कल्पना असते तो त्या दृष्टीने सर्व तपासण्या करून घेतो. पण आता धकाधकीच्या फास्ट लाईफमध्ये सर्वसाधारण माणसानेही आरोग्यासाठी तात्काळ तपासणी करून घेतली पाहिजे जेणेकरून भविष्यात मोठ्या दुखण्यापासून सावध होता येईल असे मत बाज आर आर हॉस्पिटलचे मुख्य डॉ. अमीर कुरेशी यांनी व्यक्त केले.

डोंबिवलीत मागील कोरोना काळात ज्या हॉस्पिटलमध्ये रुग्णांना दर्जेदार सेवा मिळाली आणि मृत्यूच्या दारातून पुन्हा जीवदान दिले अशा अनेक कोरोना रुग्णांनी बाज आर आर हॉस्पिटलचे मनापासून आभार मानले आहेत. त्याच बाज आर आर हॉस्पिटल माध्यमातून कल्याण ग्रामीण विधानसभा क्षेत्राचे आमदार प्रमोद (राजू) पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त सोमवारी 26 सप्टेंबर रोजी मोफत वैद्यकीय शिबिराचे आयोजन केले होते. या मोफत शिबीरात प्राथमिक तपासणी, घसा, नाक, कान तपासणी, ईसीजी, मधुमेह बाबत ब्लडटेस्ट, ब्लडप्रेशर, डोळे तपासणी याशिवाय जर गंभीर आजार असल्यास केंद्र तसेच राज्य शासनाच्या वैद्यकीय योजनांच्या माध्यमातून रुग्ण सेवा अशी मोफत आरोग्य सेवा शिबिराच्या माध्यमातून देण्यात आली.