डोंबिवली : कल्याण डोंबिवली महानगर पालिका प्रभाग क्रमांक ४८, ५९ आणी ६१ मधील महिला व पुरुषांसाठी माजी जेष्ठ नगरसेवक तथा माजी स्थायी समिती सभापती जनार्दन म्हात्रे आणि ह प्रभाग सभापती रेखा जनार्दन म्हात्रे यांनी मोफत हेअर कलर कार्यक्रम आयोजित केला. या कार्यक्रमासाठी प्रभागातील लोक मोठ्या संख्येने सहभागी होवुन शेकाडोच्या संख्येने लोकांनी याचा लाभ घेतला.

शिवसेना जनसंपर्क कार्यालय, श्रीधर म्हात्रे वाडी, कर्वे रोड, डोंबिवली पश्चिम येथे दोन दिवसीय मोफत हेअर कलर उपक्रम घेण्यात आला होता. सदर कार्यक्रमाचे उद्घाटन सिने कलाकार अक्षता दास यांच्या हस्ते करण्यात आले. या उपक्रमाला अनेक मान्यवरांनी भेटी दिल्या. सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी केतकी पवार, अस्मिता खानविलकर, तुषार शिंदे, चंद्रकांत महाजन, जाई ढोले, प्रतिभा नारखेडे, उषा आचरेकर, पल्लवी इंदुरकर, शितल करंडे, ललिता मेहेर, सुनंदा रणसूबे, मलिका बगडिया, प्राची पंडित, संगीता निकम, अमित निलंकर आदींनी विशेष मेहनत घेतली.

याविषयी माजी नगरसेवक जनार्दन म्हात्रे म्हणाले, मे महिन्यात लग्नसराई हंगाम त्याचबरोबर फिरण्यासाठी लोकं बाहेर जाण्याचा बेत करतात. दरम्यान आपण चांगल दिसावं असं प्रत्येकाला वाटत असतं. चांगल दिसण्यामध्ये केसांच्या रंगाने तुम्ही तुमचे व्यक्तिमत्व बदलू शकता आणि एक नवीन लूक मिळवू शकता. केसांना रंग देणे हा केसांना रंग देण्याचा आणि त्यांना एक नवीन लूक देण्याचा एक मार्ग आहे. केसांना रंग देण्याचे अनेक प्रकार आहेत, ज्यात कायमस्वरूपी, अर्ध-कायमस्वरूपी आणि तात्पुरते केसांचा रंग असा उपक्रम आम्ही या मोफत हेअर कलर कार्यक्रम माध्यमातून प्रभागातील महिला तसेच पुरुषांसाठी ठेवला आहे.
